ऑनलाईन टीम / औरंगाबाद :
औरंगाबादेतील करमाड डीएमआयसीच्या सटाणा शिवारात रेल्वे रुळावर झोपलेल्या 14 मजुरांचा मालगाडीने चिरडल्याने मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. आज पहाटे 5.15 च्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे मध्यप्रदेशातील असलेले 19 मजूर जालना येथील एसआरजी कंपनीत काम करत होते. ते गुरुवारी रेल्वे रुळाच्या मार्गाने औरंगाबादहून भुसावळकडे जात होते. दिवसभर चालून थकल्याने सर्व मजूर रात्री रुळावरच झोपले. गाढ झोपेत असतानाच पहाटे मालगाडी आली आणि रुळावर झोपलेले 14 मजूर चिरडून ठार झाले. तर दोन जण गंभीर आहेत. तिघेजण या दुर्घटनेतून सुखरूप बचावले आहेत.









