पुलाची शिरोली / वार्ताहर
औद्योगिक ग्राहकांसाठी थकीत बिलापोटी ३२ टक्के रक्कम भरून, उर्वरित रकमेसाठी बारा समान हप्ते देण्यात येणार असल्याची माहिती विज वितरण कंपनीचे बापट कॅम्प येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता रवींद्र महाद्वार यांनी दिली. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ( स्मॅक ) येथे आयोजित वीज ग्राहक मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. स्मॅकचे उपाध्यक्ष दीपक पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अतिरिक्त कार्यकारी अभियंता संपत गावडे प्रमुख उपस्थित होते.
रविंद्र महाद्वार म्हणाले, औद्योगिक ग्राहकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थकित बिलापोटी विज वितरण कंपनीने हप्त्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यानुसार उद्योजकांनी थकीत बिलाच्या दोन टक्के रक्कम भरून विज वितरण कंपनीला रीतसर अर्जाव्दारे हप्त्याची मागणी करायची आहे. ही मागणी मंजूर झाल्यानंतर पंधरा दिवसात उद्योजकांना एकूण थकीत बिलाच्या तीस टक्के रक्कम भरावी लागणार आहे. त्यानंतर उर्वरित ६८ टक्के रकमेवर समान बारा हप्ते करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या बिलामध्ये ही हप्त्याची रक्कम समाविष्ट करून बिल लागू होणार आहे.
विज वितरण कपनीच्या शिरोली एमआयडीसीचे अभियंता संदीप गावडे यांनी यावेळी ग्राहकांच्या शंकांचे निरसन केले. सहाय्यक लेखापाल सागर किटवाडकर व गिरीश भोसले यांनी ग्राहकांना हप्त्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.वीज वितरण कंपनीच्या या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अनेक उद्योजकांनी याप्रसंगी नोंदणी केली आहे. यावेळी विविध उद्योजकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









