प्रतिनिधी / औंध
औंधसह परीसरात काल रात्री झालेल्या अवकाळी पावसाच्या धुव्वाधार सरींनी ज्वारीचे पिक भूईसपाट झाले आहे. जोरदार पावसाने ओढे नाले भरून वाहू लागले आहेत. मात्र वातावरणातील प्रतिकूल बदलामुळे शेतकरी धास्तावला आहे.
औंध सह परिसरात काल रात्री धुव्वाधार पाऊस झाला. रब्बी हंगामातील पिकांना दिलासा असला तरी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी तडाख्याने शेतकऱ्यांचे ऊस आणि ज्वारीचे पिक पडले आहे. तसेच शेतात पाणी साठून राहिल्याने गहू हरभरा पिक कुजण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.









