वार्ताहर / औंध
औंध येथील ऐतिहासिक पद्माळे तळे पावसाने भरले असून ग्रामस्थ,भाविक भक्तांतून समाधान व्यक्त केले जात आहे. औंध मंडलात बुधवारी ८१.२० मि मि इतका पाऊस झाला असून आजपर्यंत ७२३.१०मि मि इतकी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने तळे फुल झाल्यानेआसपासच्या विहिरी, कूपनलिका या उन्हाळ्यात तग धरतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गतवर्षी ऐतिहासिक पद्माळे तळयाची जुनी दगडी भिंत तसेच तळयावरील जुने दक्षिणाभिमुख मारुती मंदिराची भिंत पडली होती, तसेच तळयावरील मोकळाई घाटानजीकची भिंत पडली होती. त्यामुळे ग्रामस्थ व भविकांच्यातून हळहळ व्यक्त होत होती.यावर उपाय म्हणून श्रीयमाई देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी पाठपुरावा करून ऐतिहासिक पद्माळे तळ्याच्या भिंतीच्या दुरुस्तीसाठी ७२ लाख ११ हजार रुपयांचा निधी मंजूर करून आणून ते काम पूर्ण करून घेतल्याने भाविक व पर्यटकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
बंगालच्या उपसागरातील अतितीव्र कमी दाबाच्या पट्यामुळे खटाव तालुक्यात धुवांधार पाऊस पडला,या पावसात औंधचे ऐतिहासिक पद्माळे तळेही भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.मोठ्या पावसापूर्वी कोरोनाच्या अटी शर्थीचे पालन करून हे काम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान होते,ते काम झाल्याने तळे पूर्ण क्षमतेने भरले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









