नवी दिल्ली
मोतीलाल ओसवाल समूहाने बांधकाम क्षेत्रात गुंतवणूकीची योजना आखली असून याअंतर्गत 1 हजार कोटी रुपये गुंतवले जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. बांधकाम क्षेत्राशी निगडीत प्रकल्पांमध्ये ही गुंतवणूक आगामी काळात टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. ही गुंतवणूक चेन्नई, मुंबई, बेंगळूर, हैदराबाद या शहरातील प्रकल्पांमध्ये होणार आहे.









