बेंगळूरः
इलेक्ट्रिक दुचाकीच्या क्षेत्रातील भारतातील आघाडीवरची कंपनी ओलाने नुकताच एक करार केला आहे. याअंतर्गत नकाशा तंत्रज्ञानाकरीता जीओस्पॉक या कंपनीचे अधिग्रहण केले असल्याची माहिती आहे. ओलाने इलेक्ट्रिक स्कूटर तर सादर केली आहेच शिवाय भाडोत्री तत्वावर वाहन उपलब्ध करण्याचाही व्यवसाय कंपनी करते. जीओस्पॉक ही नकाशा तयार करणारी स्टार्टअप कंपनी आहे. या भागीदारीतून आम्हाला चांगल्या तऱहेने आपली सेवा देता येणार असल्याचे ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी म्हटले आहे. विविध ठिकाणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साथीने बनवले जाणार आहे.









