प्रतिनिधी/ कुडचडे
दागिना हा सोन्याचा किंवा चांदीचा असो त्याला हिऱयाची जोड मिळाली की, तो अप्रतिम व अत्यंत प्रिय होतो. आतापर्यंत सोन्याच्या दागिन्यांना सर्वत्र मागणी होती. पण आता हिरेजडित दागिन्यांच्या मागणेत वाढ झाली आहे व चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे अशा दागिन्याचे विविध डिझाईन्स बाजारात दिसू लागले आहेत. अंगभूत चमक असलेला हिरा कोणत्याही दागिन्याबरोबर परिधान करणाऱया व्यक्तीचे सौंदर्य खुलवतो. त्याचबरोबर असे दागिने खरेदी करताना काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक असते. याबाबतीत सर्व ती काळजी घेऊन ग्राहकांसाठी उत्तम हिरेजडित दागिने उपलब्ध करण्याची जबाबदारी घेतलेल्या ‘ओरा डायमंड’कडून कुडचडे येथील रवींद्र भवनमध्ये प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या प्रदर्शनात कमीत कमी 18 हजार रुपये किमतीपासून अनेक सुंदर दागिने मांडलेले आहेत. सदर प्रदर्शनाला फक्त स्त्रियांचाच नव्हे, तर पुरुषांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकूण तीन दिवसांसाठी आयोजन केलेल्या या प्रदर्शनाचा आज शनिवारी शेवटचा दिवस असून ग्राहकांनी भेट देऊन या संधीचा लाभ घ्यावा. यात ग्राहकांना हिऱयांच्या दागिन्याच्या घडण करण्याच्या कामावर 20 टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच ईएमआयचीही सुविधा उपलब्ध आहे, अशी माहिती व्यवस्थापक पराग रिवणकर यांनी या प्रतिनिधीला दिली. ओरा ही भारतातील उत्तम सोन्याचे दागिने बनविणाऱयांच्या यादीत आहे. तसेच देशातील 22 शहरांत दागिन्यांची आस्थापने आहेत. गोव्यात याअगोदर विविध तालुक्यांत अशी प्रदर्शने झालेली असून त्यातील खरेदीतून ग्राहक खूष झालेले आहेत. सध्या हॉटेल भूषण, पणजी आणि श्री बोडगेश्वर देवस्थानच्या समोर, म्हापसा या ठिकाणी जाऊन ग्राहक आपली आवड चोखाळून पाहू शकतात, असे रिवणकर यांनी सांगितले.









