नवी दिल्ली
ओमेगा सेइकी मोबिलीटीने आपल्या नव्या व्यावसायिक आणि प्रवासी वाहनांचे बाजारात लाँचिंग केले आहे. ही वाहने इलेक्ट्रीकवर आधारीत असणार आहेत. इलेक्ट्रीकवर आधारीत तीनचाकी मालवाहू ‘सन री’, इ-रिक्षा ‘राइड’ व ऑटो रिक्षा ‘स्ट्रीम’ अशा तीन वाहनांचे नुकतेच भारतात सादरीकरण करण्यात आले आहे. या वाहनात लिथीयम बॅटरी असून 50 किमी इतके मायलेज देते. पुढील वर्षी कार्गो वाहन व दुचाकी मार्चमध्ये दाखल केली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. वाहनांसाठीचे भाग हे स्थानिक स्तरावरच तयार केले जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे.









