मास्को
कोरोनाव्हायरसच्या नव्या ओमिक्रॉन या व्हेरियंटने सर्वच देशांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण केले आहे. गेल्या महिनाभराच्या काळामध्ये विविध देशांमध्ये या व्हेरियंटचे अनेक रुग्ण नव्याने समोर येत आहेत. या ओमिक्रोनविरुद्ध लढण्यासाठी रशियाची स्पुतनिक व्ही लस उपयुक्त ठरत असल्याचा संशोधकांचा दावा आहे. रशियातील डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांनी या संदर्भातली माहिती नुकतीच दिली आहे. स्पुतनिक व्ही लस ओमिक्रॉन व्हेरियंटविरुद्ध बऱयापैकी अँटीबॉडी तयार करत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या लसीचा फायदा ओमिक्रॉनच्या रुग्णांना निश्चितच होणार असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. गमलेया रिसर्च सेंटरने या लसीचा वापर ओमिक्रॉनच्यासंदर्भात आपल्या प्रयोगशाळेमध्ये केला असता त्यात ती यशस्वी ठरली आहे, सदरची लस ही गंभीर आजारी आणि ओमिक्रॉन रुग्णाला इस्पितळात भरती होण्यापासून रोखण्यासाठी मदत करते.









