ऑनलाईन टीम / मुंबई :
ओमिक्रॉनने थैमान घातलेल्या दक्षिण आफ्रिकेतून जवळपास एक हजार प्रवासी मुंबईत आले आहेत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ही धक्कादायक माहिती उघड केली असून, मुंबईकरांची चिंता वाढली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन हा कोरोनाचा धोकादायक व्हेरिएंट आढळून आल्यानंतर अनेक देशांनी तेथून येणाऱया प्रवाशांवर निर्बंध आणले. भारत सरकारनेही 13 देशातील प्रवाशांवर निर्बंध लावत त्यांना कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी 7 दिवस क्वारंटाईन बंधनकारक केले. त्यानंतर राज्य सरकारनेही तेथून येणाऱया प्रवाशांवर निर्बंध लावले. मात्र, 10 नोव्हेंबरपासून याच दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत जवळपास एक हजार प्रवासी आले आहेत. त्यांची माहिती मिळवली असून, त्यांना पालिकेकडून फोन केले जात आहेत. तसेच त्यांची क्वारंटाईनची व्यवस्थाही करण्यात येत आहे.