ऑनलाईन टीम/तरुण भारत
जगभरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले कडक निर्बंध शिथिल करताच आता पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरिएंट डोके वर काढत आहे. दरम्यान, भारतीय वंशाच्या एका ब्रिटीश तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, कोरोनाचा नवा व्हेरिएंट प्राणघातक ठरणार आहे. केंब्रिज इन्स्टिट्यूट फॉर थेरप्यूटिक इम्युनोलॉजी अँड इन्फेक्शियस डिसीजेस मधील क्लिनिकल मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक रवींद्र गुप्ता म्हणाले की, ओमिक्रॉनची व्हायरसची कमी गंभीरता एक चांगली गोष्ट आहे, म्हणजेच प्रत्यक्षात व्हायरसच्या रचनात्मक बदलांमध्ये ही एक उत्क्रांतीतील चूक आहे.