वृत्तसंस्था/ मुंबई
अष्टपैलू मुलानीच्या नेतृत्वाखाली मुंबईचा क्रिकेट संघ शनिवारी ओमानच्या दौऱयावर रवाना झाला. मुंबई संघाचा ओमान दौरा मर्यादित असून या दौऱयात तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत. या दौऱयासाठी राजस्थान रॉयल्स संघाने शिवम दुबे आणि जैस्वाल यांना अधिकृत परवानगी दिली आहे.
मुंबईचे वरिष्ठ निवड समिती सदस्य प्रमुख सलील अंकोलाने 14 जणांचा संघ जाहीर केला आहे. ओमान आणि मुंबई यांच्यात 22, 24, 26 ऑगस्ट रोजी तीन टी-20 सामने खेळविले जातील. त्यानंतर 29, 31 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर रोजी तीन वनडे सामने होणार आहेत. मुंबई संघाचे मस्कतमध्ये आगमन झाल्यानंतर या संघाला एका दिवसासाठी क्रवारंटाईनमध्ये राहावे लागले. 3 सप्टेंबरला मुंबईचा संघ मस्कतला रवाना होईल. आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी ओमानचा संघ पात्र ठरला आहे. त्याच्या तयारीसाठी त्यांनी या मालिकेचे आयोजन केले आहे.
मुंबई संघ- मुलानी (कर्णधार), गोमेल, हार्दिक तमोरे, अरमान जाफर, चिन्मय सुतार, शिवम दुबे, अमन खान, सुजित नाईक, जैस्वाल, शशांक अतार्डे, मोहित अवस्थी, साईराज पाटील, दीपक शेट्टी आणि धुमिल मटकर.









