उजगाव बडदवाडी येथील घटना
प्रतिनिधी / संगमेश्वर
उजगाव पवारवाडी ते बडदवाडी या मार्गावर भरधाव वेगाने ओमनी गाडी चालवत रस्त्यावरुन चालत असलेल्या बालकाला धडक दिल्याने बालकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
अंश अंकुश कानसरे (वय 6 वर्षे) असे अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. याबाबत देवरुख पोलीस ठाण्यात सुषमा सुरेंद्र कानसरे हिने फिर्याद दिली आहे. प्रवीण प्रभाकर पवार (रा. उजगाव, पवारवाडी) हा आपल्या ताब्यातील ओमनी (गाडी क्रमांक एम एच 08 एजी 3779) ही गाडी घेऊन भरधाव वेगाने पवारवाडी ते बडदवाडी असा जात होता. रविवारी संध्याकाळी 5.30 दरम्यान उजगाव बडदवाडी येथे आला असता अंश कानसरे याला धडक बसल्याने तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी संगमेश्वर येथे दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले. ओमनी चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. या अपघाताची नोंद देवरुख पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बाईंग हे करीत आहेत.








