मुंबई \ ऑनलाईन टीम
विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात काही दिवसांपू्र्वी भेट झाली. या भेटीत नेमके काय घडले याबाबतचा खुलासा खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्र भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
परवा माझ्याकडे माननीय भुजबळ साहेब आले होते. मी त्यांना सांगितलं आमच्यासाठी हा राजकीय विषय नाही. आम्ही तुम्हाला मदत करतो. तुमच्या नेतृत्वात करू. आम्हाला ओबीसींचं आरक्षण परत मिळालं पाहीजे. तुम्ही बैठक बोलवा, त्या बैठकीला येऊन मी काय हवं ते सांगतो. सरकारची नियत जर साफ असेल तर केंद्र सरकारकडे बोटं दाखवण्याऐवजी सरकार स्वत:ची जबाबदारी पार पाडावी. मला जे काही वाटतंय त्याबद्दल त्यासंदर्भात नोट देखील करुन देण्यास तयार आहे. आपण एकत्रितपणे काम करु, त्यात काही अडचण नाही. तुम्ही माझी कोणत्याही ज्येष्ठ वकिलाकडून तपासा ते सांगतील की हीच पद्धत आहे, याच पद्धतीने आपल्याला काम करावे लागेल. त्यामुळे सरकारची जर नियत साफ असेल तर सरकारची जबाबदारी हे सरकार पार पाडेल. काम करायचे नसेल तर सर्वेक्षण, कमिटी करत रहायचे. टाईमपास करत रहायचा, तो टाईमपास याठिकाणी सरककारच्या कामकाजात दिसत आहे. हा टाईमपास सरकारने बंद केला पाहिजे. म्हणूनच जोपर्यंत ओबीसींचे आरक्षण परत मिळत नाही तोवर भाजप गप्प बसणार नाही असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विधानसभेत ठराव पास केला जातो, की केंद्र सरकारने आम्हाला सेन्सस डेटा उपलब्ध करून द्यावा. हे षडयंत्र आहे. ६० ते ७० टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या फेब्रुवारीत येणार आहेत. फेब्रुवारीपर्यंत टाईमपास करायचा. फेब्रुवारीला या निवडणुका संपल्या की, पुढची सात वर्षे ओबीसी आरक्षण देऊनही फायदा नाही. त्या आरक्षणाचा लाभच मिळणार नाही. म्हणून केंद्राने डेटा द्यावा, असं रोज त्या ठिकाणी बोललं जात आहे. मी संन्यास घेईन ये मी जाणीवपूर्वक बोललो. पुढची २५ वर्षे मला भारतीय जनता पक्षात काम करायचं आहे. तरी मी जबाबदारीने बोललो कारण मला माहिती आहे, हे आरक्षण दिलं जाऊ शकतं. ओबीसींचं आरक्षण रद्द झालेलं नाही. केवळ इम्पेरिकल डेटा सादर न केल्याने ओबीसींचं महाराष्ट्रातील आरक्षण स्थगित करण्यात आलं आहे. देशातलं आरक्षण रद्द झालेलं नाही. केवळ महाराष्ट्राचं आरक्षण रद्द झालेलं आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालं आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी सभेत केली.
Previous Articleइनरव्हील क्लब, वेंगुर्लेच्या अध्यक्षपदी ज्योती देसाई
Next Article सांगली : चरण येथील किराणा दुकान फोडले








