मुंबई \ ऑनलाईन टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भुजबळांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर जाऊन ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा केली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळही उपस्थित होते.
इम्पेरिकल डाटा केंद्राने द्यावा अशी मागणी राज्य सरकारची आहे. त्यासंदर्भात भुजबळ फडणवीसांना भेटले, तसंच सरकारला मदत करावी, अशी चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभेचं पावसाळी अधिवेशन पाच आणि सहा तारखेला दोन दिवसांचं झालं. त्यावेळीही याच विषयावर चर्चा झाली होती. त्यावेळी भुजबळांनी प्रस्ताव मांडला होता, त्यावेळी विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली होती. यानंतर भाजपने चक्का जाम आंदोलनाची हाक दिली. मात्र भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्याची ऑफर देत, ते आमचे बॉस आहेत हवे तर सर्व श्रेय त्यांनी घ्यावे पण आमचे आरक्षण वाचवावे असे सांगितले. मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा फडणवीस यांनी केंद्राकडून डाटा आणून द्यावा. आमचे सरकार त्या आधारे इम्पिरिकल डाटा तयार करून दोन महिन्यांत आरक्षण देईल असेही भुजबळ म्हणाले. त्यामुळे फडणवीस यांनी पुढाकार घेवून केंद्राकडून डाटा आणावा याकरीता आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. केंद्राने लगेच डाटा दिला तर दोन महिन्यांत सरकार हे आरक्षण पुन्हा बहाल करून दाखवेल असे आव्हान भुजबळ यांनी दिले. या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांची भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








