नवी दिल्ली
ओप्पो या कंपनीने नुकताच आपला अनेक वैशिष्टय़ांसह नवा एफ 15 हा स्मार्टफोन बाजारात दाखल केला आहे. 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजच्या व्यवस्थेसह येणारा हा फोन ग्राहकांना 16 हजार 990 रुपयांना खरेदी करता येणार आहे. हा फोन युनिकॉर्न व्हाइट, लाइटनिंग ब्लॅक आणि बेजिंग ब्लू या रंगात उपलब्ध होणार असून 27 जुलैपासून ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध झालाय. ऍड्रॉइड 9 पीओएसवर आधारीत हा स्मार्टफोन 6.4 इंच फूल्ल एचडी प्लस ऍमोलेड डिस्प्लेसह येणार आहे. 4 हजार एमएएच बॅटरीसह वीओओसी 3.0 फ्लॅश चार्जच्या वैशिष्टय़ासह उपलब्ध असेल. याखेरीज याला 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा असणार आहे.









