नेन्डोसोबत भागीदारी : अनेक सुविधा
वृत्तसंस्था/ शांघाय
चिनी स्मार्टफोन बाजारात ओप्पोची वाटचाल दमदार सुरू आहे. याअंतर्गत नुकतेचे ओप्पोने स्लाइड फोनसह उपकरणे सादर केली आहेत. ओप्पोकडून नेन्डो यांच्यासोबत भागिदारी करुन चौथ्या चायना इंटरनॅशनल इंडस्ट्रीयल डिझाइन एक्स्पोमध्ये (सीआयआयडीइ) ‘स्लाइड फोन’ व म्युझिकलिंक उपकरणे सादर केली आहेत.
ओप्पोने जपानी डिझाइन फर्म नेन्डो यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे. स्लाइड फोन कंपनीने सादर केला असून या संकल्पनेत बहुपर्यायी फोल्डेबल स्क्रीन्स आहेत. मोठय़ा स्क्रीन्सचे फोन सध्या चलतीत असून यासाठी स्लाइड फोनचा पर्याय उपयुक्त ठरू शकतो, असे ओप्पोने म्हटले आहे.
तीन टप्प्यात हा फोन उघडणार असल्याचे कंपनीने सांगून पहिल्या दीड इंचाच्या स्क्रीनवर वेळ, हवामानाची माहिती उपलब्ध होईल तर 3.1 इंचाच्या स्क्रीनवर व्हिडीयो कॉल्स, सेल्फी व इतर सुविधांचा लाभ घेता येणार असून शेवटच्या 7 इंचाच्या स्क्रीनवरही सुविधा असणार आहेत. म्युझिक लिंक उपकरणांमध्ये टीडब्ल्यूएस इयरफोन, स्मार्टवॉच, एआय स्पीकर, पोर्टेबल चार्जर व वायरलेस चार्जरची सुविधाही असणार आहेत.









