ऑनलाईन टीम / भुवनेश्वर :
ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधील राजभवन जवळील एका पेट्रोल पंपाला आग लागल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली असून अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत.
पोलीस कमिशनर सुधांशू सारंगी यांनी सांगितले की, या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. तर अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनस्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.









