ऑनलाईन टीम / भुवनेश्वर :
ओडिशा आणि उत्तराखंडात काल रात्री उशिरा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. ओडिशा मधील मयुरभंज मध्ये रात्री 2 वाजून 13 मिनिटांनी भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टल स्केल एवढी होती.

तर दुसरीकडे उत्तराखंडातील पिथौरागडमध्ये देखील काल रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. या, भूकंपाची तीव्रता 2.6 रिश्टल स्केल एवढी होती. हा भूकंप पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी झाला.

या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले. दरम्यान, याआधी मंगळवारी हरिद्वारमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते.









