मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची घोषणा
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
कोरोना महामारीविरोधात कार्यरत असणाऱया योद्धय़ांचा सन्मान करण्याच्या दृष्टीने ओडिशा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या लढय़ामध्ये दुर्दैवाने मृत्यु आल्यास त्याला हुत्मात्याचा दर्जा देण्यात येणार असून अंतिम संस्कार शासकीय इतमामात केले जातील, असे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री पटनायक यांनी या योद्धय़ांना 50 लाखाचे विमा संरक्षणही जाहीर केले आहे. खासगी आणि शासकीय सेवेत असणाऱया सर्व डॉक्टर्स, कर्मचारी आणि अन्य अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱयांसाठी ही योजना लागू केली आहे. पेंद्र सरकारच्या मदतीने ही योजना आखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या महामारीच्या लढय़ामध्ये दुर्दैवाने एखाद्या कर्मचाऱयाचा मृत्यु झाल्यास त्याला हुत्मात्मा समजण्यात येणार आहे. राष्ट्रासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाचे दखल घेऊन राजकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांना कोणत्या प्रकारे पुरस्कार देऊन सन्मानित करता येईल, याचा विचार करण्यासाठी लवकरच समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले. या कर्मचाऱयांना मारहाण, विरोध करणाऱयांना कोणत्याही पातळीवर क्षमा केली जाणार नाही, तो फौजदारी गुन्हा मानून त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री पटनायक यांनी स्पष्ट केले. राज्यात आतापर्यंत 79 संशयित समोर आले असून बालासोर, भद्रक आणि जाजपूर जिल्हय़ात बाधितांची संख्या अधिक असल्याचे सांगितले. तर यातील अधिकांश लोक पश्चिम बंगालमधून परत आल्यानंतर त्यांच्यात लक्षणे दिसून आल्याने सर्व जिल्हाधिकाऱयांना त्यांचा शोध घेऊन सतर्कता बाळगण्याच्या सूचनाही केल्या आहेत.









