साहित्य : अर्धी वाटी पिवळी मूगडाळ, अर्धी वाटी ओट्स, 1 कांदा बारीक चिरून, 2 चमचे दही, 1 हिरवी मिरची बारीक चिरून, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा लाल तिखट पावडर, पाव चमचा गरम मसाला पावडर, पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरते मीठ, 2 चमचे तेल
कृती : मूगडाळ धुवून वाटीभर गरम पाण्यात टाकून शिजवून घ्यावी. नंतर गार झाली की निथळून मिक्सरला लावून पेस्ट बनवून घ्यावी. आता या पेस्टमध्ये इतर साहित्य मिक्स करून घ्यावी. नंतर त्याची एकसमान टिक्की बनवावी. आता नॉनस्टिक तव्यावर तेलाचे थेंब टाकून पसरवावे. त्यावर तयार टिक्की ठेवून कडेने तेल सोडून शालोफ्राय करावेत. टिक्की दोन्ही बाजूने हलक्या सोनेरी रंगावर आली की काढावी. आता तयार ओट्स टिक्की तयार ग्रीन चटणीसोबत खाण्यास द्या.