ओटवणे / वार्ताहर-
ओटवणे मांडवफातरवाडी येथील रहिवासी आनंद न्हानू कवठणकर (५२) यांचे गुरुवारी २७ मे रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी जिल्हा परिषद रस्ता बांधकाम विभागातून निवृत्ती घेतली होती. येथील विजय कवठणकर ते वडील तर रवींद्र कवठणकर यांचे ते भाऊ होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, भावजय, पुतणी असा परिवार आहे.









