प्रतिनिधी / संगमेश्वर
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर जवळच्या ओझरखोल येथे दुचाकी दरीत कोसळून दुचाकी चालक जागीच ठार झाला. संकेत विजय चव्हाण असे दुचाकी चालकाचे नाव असून तो लांजा येथील रहिवाशी आहे. अनोळखी वाहनाने धडक दिल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटून हा अपघात घडला आहे. हा अपघात शनिवारी सकाळी घडला. या अपघाताची माहिती समजताच संगमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.









