नवी दिल्ली
तंत्रज्ञानासोबत पारदर्शकता आणण्यासह खासगी क्षेत्राला जोडत तेल आणि गॅस उत्पादन वाढविण्यावर भर देणार असून यासाठी विशेष योजना आखली जात असल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अमरनाथ यांनी 28 ऑक्टोबर रोजी ओएनजीसीचे अध्यक्ष सुभाष कुमार यांना या संबंधीचे पत्र लिहून माहिती दिली होती.
उत्पादन वाढविण्यासाठी भागीदारी
उत्पादन वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारी करण्यासाठी निमंत्रण देण्यात आले असून यामध्ये 60 टक्के भागीदारी व संचालन देणार असल्याचे संकेत आहेत. सदरच्या प्रस्तावास ओएनजीसीच्या संचालकांसोबत त्यांच्या युनियनचाही विरोधाचा सामना करावा लागत आहे.









