वृत्तसंस्था/ मुंबई
अखिल भारतीय वरिष्ठ महिला निवड समितीने मंगळवारी ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी भारतीय महिला संघांची घोषणा केली असून कसोटी, वनडे व टी-20 या तीनही संघात स्नेह राणाला स्थान मिळाले आहे.
या दौऱयात भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 वनडे, एक डे-नाईट कसोटी व 3 टी-20 सामने खेळणार आहे. यावर्षी झालेल्या इंग्लंड दौऱयात स्नेह राणाने शानदार प्रदर्शन केल्याने तिने संघातील स्थान कायम राखले आहे. 29 किंवा 30 ऑगस्ट रोजी महिला संघ बेंगळूरहून ऑस्ट्रेलियाकडे रवाना होणार आहे. तेथे गेल्यानंतर ते दोन आठवडय़ासाठी क्वारन्टाईन होतील. इंग्लंडमध्ये झालेली एकमेव कसोटी भारताने अनिर्णीत राखली होती. पण वनडे व टी-20 मालिका भारताला गमवाव्या लागल्या होत्या. ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी निवडण्यात आलेले भारतीय महिला संघ पुढीलप्रमाणे आहेत.
कसोटी व वनडे संघ ः मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, पूनम राऊत, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, यास्तिका भाटिया, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), शिखा पांडे, झुलन गोस्वामी, मेघना सिंग, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, रिचा घोष, एकता बिश्त.
टी-20 संघ ः हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, यास्तिका भाटिया, शिखा पांडे, मेघना सिंग, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, रिचा घोष (यष्टिरक्षक), हरलीन देओल, अरुंधती रेड्डी, राधा यादव, रेणुका सिंग ठाकुर.









