वृत्तसंस्था/ ऍडलेड
यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघातील तीन सामन्यांची टी-20 ऍशेस मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील शनिवारी येथे दुसरा सामना पावसामुळे रद्द करावा लागला.
या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी ऍडलेडमध्ये गोळविला जाणार आहे. शनिवारी झालेल्या दुसऱया सामन्यात केवळ 4.1 षटकांचा खेळ झाला आणि इंग्लंडने 25 धावा जमविल्या होत्या. या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 9 गडय़ांनी दणदणीत पराभव करत 1-0 आघाडी मिळविली आहे.









