सिडनी / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ या वर्षात ऍशेसपूर्वी अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. होबार्ट येथील ब्लंडस्टोन एरेनावर दि. 27 नोव्हेंबरपासून या लढतीचे आयोजन केले गेले आहे. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. अफगाणला 2018 मध्ये कसोटी दर्जा बहाल केला गेला असून आतापर्यंत खेळलेल्या 6 कसोटीत 3 सामने जिंकण्याचा पराक्रम त्यांनी गाजवला आहे. अफगाण-ऑस्ट्रेलिया हे संघ गतवर्षीच कसोटी क्रिकेटमध्ये आमनेसामने भिडणार होते. मात्र, कोरोनामुळे ही लढत लांबणीवर टाकावी लागली होती.









