सिडनी
ऑस्ट्रेलियात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सरकारला पुन्हा कडक निर्बंधाचे हत्यार उपसावे लागले आहे. न्यू साऊथ वेल्स परिसरात शुक्रवारी 642 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून सरकारने याची दखल घेत खबरदारी म्हणून लॉकडाऊनचा अंमल सुरू केला आहे.
सदरचा लॉकडाऊन सप्टेंबरअखेरपर्यंत जारी असणार आहे. सिडनीच्या उपनगरांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढले असल्याची बाब सरकारच्या निदर्शनाला आली आहे. दररोज 500 च्या वर रुग्ण आढळून येत असल्याने सरकारला खबरदारीचे पाऊल उचलावे लागते आहे. सर्वांच्या आरोग्याचा व सुरक्षिततेचा विचार करूनच मनावर दगड ठेऊन निर्णय घ्यावा लागत असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.