वृत्तसंस्था/ मेलबोर्न
आगामी विंडीज आणि बांगलादेश दौऱयासाठी घोषित करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या प्राथमिक संघामध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जादा सहा खेळाडूंचा समावेश केला आहे.
जैविक सुरक्षा प्रक्रियेमुळे दमछाक झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या काही आघाडीच्या क्रिकेटपटूंनी विंडीज आणि बांगलादेश दौऱयावर जाण्याची शक्यता कमी असल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यापूर्वी घोषित केलेल्या प्राथमिक संघामध्ये आणखी सहा खेळाडूंचा समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या या आगामी दौऱयाला 10 जुलैपासून प्रारंभ होणार आहे. आता या आगामी वनडे मालिकांसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात एकूण 29 क्रिकेटपटूंचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने बेन मॅकडरमॉट, डॅन ख्रिस्तियन, कॅमेरून ग्रीन, ऍस्टन टर्नर, वेस ऍगर आणि नाथन इलिस या सहा क्रिकेटपटूंचा प्राथमिक संघात समावेश केला आहे,. विंडीजच्या दौऱयावर ऑस्ट्रेलियन संघ तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे. त्यानंतर म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला ऑस्ट्रेलियन संघ बांगलादेशच्या दौऱयात पाच टी-20 सामने खेळणार आहे. 28 जून रोजी ऑस्ट्रेलियाचा संघ चार्टर फ्लाईटने विंडीजला प्रयाण करणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघ- ऍरॉन फिंच (कर्णधार), ऍस्टन ऍगर, वेस ऍगर, बेहरेनडॉर्फ, कॅरे, डॅन ख्रिस्तियन, पॅट कमिन्स, इलिस, ग्रीन, हॅजलवूड, हेन्रीक्स, मिचेल मार्श, मॅक्सवेल, मॅकडरमॉट, मेरेडिथ, फिलीप, जे. रिचर्डसन, केन रिचर्डसन, तन्वीर सांघा, शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, स्टार्क, स्टोईनिस, स्वॅप्सन, टर्नर, टाय, वेड, वॉर्नर, झंपा.









