ऑस्ट्रेलियात एक असे फंगस निर्माण झाले आहे, जे पाहून वैज्ञानिक हैराण झाले आहेत. हा फंगस एखाद्या झॉम्बीच्या बोटांसारखा दिसतो. झॉम्बीचा अर्थ एखाद्या माणसाचा सडलेला देह असा होतो.
ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनाऱयानजीक बेटावर तुटलेल्या आणि कोसळलेल्या झाडांवर फंगस निर्माण झाले आहेत. ऑस्टेलियात याला टी-ट्री फिंगर म्हटले जाते. तर वैज्ञानिक भाषेत याला हायपोक्रिपोसिस एम्प्लेकटेंस म्हणण्यात येते. रॉयल बॉटेनिक्स गार्डन्स व्हिक्टोरियाने या फंगसची तपासणी केली आणि ते झॉम्बी फिंगर्स असल्याची पुष्टी दिली आहे. झॉम्बी फिंगर्स कोसळलेल्या झाडांवर उगवले आहेत.
पहिल्या नजरेत या झॉम्बी फिंगर्सना पाहून कुणीही घाबरेल. त्यांचा विकृत आकारच या फंगसची वाढ करण्यास मदत करत असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले आहे. झॉम्बी फिंगर्स परजीवी असतात, जे मृत वृक्ष आणि त्याच्या सालींचे भक्षण करून वाढतात. त्यांना लार्वा आणि छोटे किटकही अत्यंत पसंत आहेत. झॉम्बी फिंगर्स इकोसिस्टीमचा एक महत्त्वाचा हिस्सा देखील आहे.
व्हिक्टोरिया प्रेंच बेटावरील नॅशनल पार्कमध्ये टी-ट्रीवर झॉम्बी फिंगर्स पॅरासाइट फंगस दिसून आले आहेत. एकाचठिकाणी सुमारे 100 हून अधिक झॉम्बी फिंगर्स मिळाले आहेत. झॉम्बी फिंगर्स एका विशिष्ट स्थितीतच तयार होतात. या स्थितीत किंचित फरक झाला तरीही त्यांचे अस्तित्व दिसून येत नाही.









