वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू ग्रीम वॅटसन यांचे शुक्रवारी कर्क रोगाने निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुंटूबियांनी दिली. वॅटसन कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात वैद्यकीय उपचार चालू होते.
1960 आणि 1970 च्या दशकामध्ये अष्टपैलू ग्रीम वॅटसन यांनी पाच कसोटी आणि दोन वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले आहे. ऑस्ट्रेलियातील शेफिल्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेत तीन संघाचे प्रतिनिधीत्व करणारे वॅटसन हे ऑस्ट्रेलियाचे पहिले क्रिकेटपटू ठरले. ग्रीम वॅटसन हे मध्यफळीतील उपयुक्त फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज म्हणून ओळखले जात पण त्यांना क्रिकेट क्षेत्रामध्ये आपली तंदुरूस्ती अधिकवेळ राखता आली नाही. एका सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टोनी ग्रेगच्या उसळत्या चेंडूवर वॅटसन यांच्या चेहऱयावर गंभीर दुखापत झाल्याने त्यांना क्रिकेट क्षेत्रातून लवकर नेतृत्व व्हावे लागले. इयान चॅपेलच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघात वॅटसन यांचा समावेश होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियातर्फे वॅटसन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.









