वृत्तसंस्था/ मेलबर्न
रविवारी येथे झालेल्या येरा व्हॅली क्लासिक महिलांच्या टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या टॉप सीडेड ऍश्ले बार्टीने एकेरीचे जेतेपद मिळविताना स्पेनच्या मुगुरूझाचा अंतिम सामन्यात पराभव केला.
ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेपूर्वीच्या या सरावाच्या स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात बार्टीने स्पेनच्या मुगुरूझाचा 7-6 (7-3), 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला. या सामन्यात मुगुरूझाने बार्टीला विजयासाठी चांगलेच झुंजविले. डब्ल्यूटीए टूरवरील या स्पर्धेत घरच्या मैदानावर बार्टीचे हे दुसरे विजेतेपद आहे.









