पीसीबीची अनोखी रणनीती, रावळपिंडी, कराची, लाहोरमध्ये कसोटी सामन्यांचे आयोजन
कराची / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायभूमीत खेळवल्या जाणाऱया 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानने 16 सदस्यीय व 5 राखीव खेळाडूंचा संघ जाहीर केला असून जलद गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून ऑस्ट्रेलियन माजी गोलंदाज शॉन टेटची नियुक्ती केली आहे. उभय संघातील 3 कसोटी सामने अनुक्रमे रावळपिंडी, कराची व लाहोर येथे खेळवली जातील.
यापूर्वी, बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या कसोटी मालिकेतील संघात पाकिस्तानने 3 बदल केले आहेत. 2021 मध्ये दक्षिण आफ्रिका व झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी मालिकेत खेळलेल्या हॅरिस रौफचा ऑफस्पिनर बिलाल असिफऐवजी समावेश केला. यासीर शाहचा राखीव खेळाडूत समावेश आहे.
पाकिस्तान सुपर लीगमध्ये समावेश नसलेले कसोटीवीर बुधवार दि. 16 रोजी कराचीतील नॅशनल स्टेडियमवर प्रशिक्षण शिबिरात दाखल होतील. दरम्यान, पुढील एका वर्षासाठी सकलेन मुश्ताकच संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल, अशी घोषणा पीसीबीने केली आहे. गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून शॉन टेटशी 12 महिन्यांचा करार केला गेला असून मोहम्मद युसूफला फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
पाकिस्तानचा कसोटी संघ ः बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, अब्दुल्लाह शफीक, अझर अलू, फहीम अश्रफ, फवाद आलम, हॅरिस रौफ, हसन अली, इमाम-उल-हक, मोहम्मद नवाझ, नौमन अली, साजिद खान, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, झाहीद महमूद. राखीव खेळाडू ः यासीर शाह, सर्फराज अहमद, नसीम शाह, मोहम्मद अब्बास, कमरान गुलाम.
सहायक पथक ः मन्सूर राणा (व्यवस्थापक), सकलेन मुश्ताक (मुख्य प्रशिक्षक), शाहिद अस्लम (सहायक), मोहम्मद युसूफ (फलंदाजी प्रशिक्षक), शॉन टेट (गोलंदाजी प्रशिक्षक), फिजीओ ः ड्रिकूस सैमन (ट्रेनर), अब्दुल मजीद (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक), इम्माद अहमद हमीद (माध्यम, डीजिटल मॅनेजर), उस्मान अनवरी (सुरक्षा व्यवस्थापक), तल्हा इजाझ (ऍनालिस्ट), मलंग अली (मसाजर).
बॉक्स
पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया दौऱयातील कार्यक्रम
तारीख / लढत / ठिकाण
4 ते 8 मार्च / पहिली कसोटी / रावळपिंडी
12 ते 16 मार्च / दुसरी कसोटी / कराची
21 ते 25 मार्च / तिसरी कसोटी / लाहोर
29 मार्च / पहिली वनडे / रावळपिंडी
31 मार्च / दुसरी वनडे / रावळपिंडी
2 एप्रिल / तिसरी वनडे / रावळपिंडी
5 एप्रिल / एकमेव टी-20 / रावळपिंडी.









