कोलंबो / वृत्तसंस्था
हॅझलवूड-स्टार्कचे एकत्रित 7 बळी व फिंच-वॉर्नरच्या अभेद्य भागीदारीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी-20 सामन्यात यजमान श्रीलंकन संघाचा 10 गडी राखून फडशा पाडला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. प्रारंभी, पावसाने व्यत्यय आलेल्या डावात लंकेला 19.3 षटकात सर्वबाद 128 धावा करता आल्या. हॅझलवूडने 16 धावात 4 तर स्टार्कने 26 धावात 3 बळी घेतले. प्रत्युत्तरात फिंच (नाबाद 61), वॉर्नर (नाबाद 70) यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाने 14 षटकात बिनबाद 134 धावांसह विजय साकारला. उभय संघातील दुसरी टी-20 आज (बुधवार) होईल.









