ख्राईस्टचर्च / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडचा दौरा पुढील सूचना येईतोवर लांबणीवर टाकण्यात आला आहे. पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे दि. 24 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत हा दौरा होणे अपेक्षित होते. या छोटेखानी दौऱयात 3 टी-20 सामने होणार होते. न्यूझीलंडचा दौरा मालिकेनंतर मायदेशी केव्हा परतू शकेल, याबाबत काहीही चित्र स्पष्ट होत नसल्याने सदर दौरा लांबणीवर टाकण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. 10 दिवसांचे सक्तीचे आयसोलेशन असल्याने त्याचाही परिणाम झाला.









