वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
8 फेब्रुवारीपासून मेलबर्नमध्ये सुरू होणाऱया 2021 सालातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत भारताचा टेनिसपटू सुमीत नागलला पुरूष एकेरीत वाईल्डकार्डद्वारे प्रवेश देण्यात आला आहे. या निर्णयासंदर्भात ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेच्या वेबसाईटवर नागलच्या निर्णयासंदर्भात अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही. पण ऑस्ट्रेलियातील प्रसार माध्यमाने नागलच्या प्रवेशाची बातमी दिली आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी मॉर्निंग हेराल्ड या वृत्तपत्राने ही बातमी प्रसिद्ध केली आहे. सुमीत नागल आणि वेंग झियु या दोन टेनिसपटूंना या स्पर्धेत वाईल्डकार्ड प्रवेश देण्यात आला आहे.









