वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रीयाचा 28 वर्षीय पुरूष टेनिसपटू डॉम्निक थिएमने कोरोना समस्येच्या भीतीमुळे विविध टेनिस स्पर्धांतून माघार घेतली आहे. गेल्या जूनपासून त्याने कोणत्याही टेनिस स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला नाही.
पुढील महिन्यात होणाऱया एटीपी चषक, सिडनी टेनिस क्लासिक त्याचप्रमाणे एटीपी टूरवरील 250 दर्जाच्या स्पर्धेतून थिएमने माघार घेतली आहे. पुढील वर्षीच्या जानेवारी महिन्यात होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत आपण सहभागी होणार असल्याचे थिएमने सांगितले. थिएमने गेल्यावर्षी अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली होती. त्याचे हे पहिले ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद होते.









