ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलिम्पिक पदक विजेता नेथन बागलेला 25 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर याच प्रकरणात नेथनचा भाऊ डू बागले याला 28 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी नेथनचा भाऊ डू आणि त्याच्या साथीदाराने जहाजातून 652 किलो कोकेन आणले होते. ऑस्ट्रेलियाच्या सीमेत प्रवेश करताना नेव्हीने त्यांना पाहून पाठलाग केला. त्यावेळी बागले यांनी कोकेन पॅकेट समुद्रात फेकले. मात्र, नेव्हीने त्यांना पकडून 10 अब्ज रुपयांची कोकेनची 30 पाकिटे जप्त केली होती. याप्रकरणी पोलिसांनी 2019 मध्ये नेथनलाही अटक केली होती. नेथन आणि त्याच्या भावाला मुख्य आरोपी ठरवत कोर्टाने नेथनला 25 तर डूला 28 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. नेथनने ऑलिम्पिकमध्ये दोन रौप्यपदक जिंकली होती.









