ऑराने गोव्यातील मडगाव स्टोअरमध्ये पाव दशलक्ष डॉलर्स इतक्मया किंमतीच्या झगमगत्या हि-यांनी मढलेल्या पहिल्यावहिल्या ख्रिसमस ट्रीचे केले अनावरण
प्रतिनिधी /पणजी
डिसेंबर महिना सण आणि उत्सवांची चाहूल घेऊन येतो, एका नव्या वर्षाचा सांगावा देतो आणि सरत्या वर्षांमध्ये घडून गेलेल्या संस्मरणीय प्रसंगांची उजळणी करून देतो. हि-यांच्या दागिन्यांचा भारतातील एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह ब्रॅण्ड ऑरा गोव्यातील मडगाव येथील ऑरा स्टोअर रत्नजडित ख्रिसमस ट्रीने उजळून टाकत आहे.
यावषी सणांचा हा मोसम साजरा करण्यामध्ये आघाडीवर घेतली आहे. सणाचा हा उत्साह सर्वत्र पसरविण्याकरिता आपल्या कुटुंबियांसाठी आणि मित्रमंडळींसाठी भेटवस्तूची खरेदी करताना ऑराचा हा अद्भुत ख्रिसमस ट्री तुमच्या खरेदीच्या अनुभवाला अधिकच तेजस्वी झळाळी मिळवून देणार आहे. या लक्षवेधी ख्रिसमस ट्रीला अस्सल हि-यांमध्ये घडविलेल्या आणि ऑराचे खास वैशिष्टय़ असलेल्या कौशल्यपूर्ण कारागिरीने सजलेल्या अत्यंत आकर्षक दागिन्यांनी सजविण्यात आले आहे. अशाप्रकारचा हा पहिलाच ख्रिसमस ट्री सहा फूट उंच आहे आणि त्यावर अलौकिक दागिन्यांमध्ये जडविलेला, ब्रॅण्डचे खास वैशिष्टय़ असलेला 73 फॅसेट क्राऊन स्टार हिरा झळाळत आहे. पाव दशलक्ष डॉलर्स किंमतीच्या दागिन्यांच्या थक्क करून टाकणा-या दागिन्यांची चार पाय-यांची उतरंड रचलेल्या या झाडाच्या टोकावर फिरता बेथलेहेमचा तारा विराजमान आहे.
हा चमकता मोसम साजरा करण्यासाठी भेटवस्तूंची हौसमौज पुरेपूर साजरी करण्यासाठी यंदाच्या ख्रिसमसमध्ये ऑराने काही खास स्टोअर ऑफर्सही आणल्या आहेत. यामध्ये हिऱयांच्या दागिन्यांच्या किंमतीवर 25 टक्?के सूट, सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर सरसकट 25 टक्?के सूट, ओसीएस दागिन्यांच्या किंमतीवर 5 टक्?के सूट.
या खास प्रसंगी बोलताना ऑरा ज्व?लरीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. दिपू मेहता म्हणाले, “देशातील कितीतरी लोक गोव्यामध्ये ख्रिसमस साजरा करण्याच्या तयारीत आहेत आणि सणाच्या उत्साहाने हे शहर हळूहळू व्यापून टाकले आहे. यावषी सुट्टीच्या मोसमाच्या पार्श्वभूमीवर मडगाव स्टोअरमध्ये हि-यांच्या पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांची विस्तृत श्रेणी ग्राहकांच्या निवडीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मडगावमध्ये आमच्या ग्राहकांचे आदरातिथ्य करण्यास आणि त्यांना दागिने खरेदीचा अतुलनीय अनुभव मिळवून देण्यास आम्ही उत्सुक आहोत.“
ब्रॅण्डच्या अशाप्रकारचा पहिलाच प्रयत्न असणारा हा ख्रिसमस ट्री केवळ मडगाव गोवा येथे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत प्रदर्शनार्थ मांडलेला पाहता येणार आहे.









