प्रतिनिधी /बेळगाव
ज्ञान प्रबोधन मंदिर या आयसीएसई शाळेच्या माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी डिव्हाईन प्रोव्हिडन्स शाळेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘ऑब्लीविया’ या आंतरशालेय महोत्सवाचे अजिंक्मयपद मिळविले. सदर महोत्सवात विविध शाळांनी भाग घेतला होता. ज्ञान प्रबोधन मंदिराच्या विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांमध्ये सहभाग दर्शवून उत्तम सादरीकरण करून बक्षिसे मिळविली. सर्वसाधारण अजिंक्यपददेखील मिळविले.
महोत्सवात ‘मिस ऑब्लीविया’ हा किताब जुही चंदगडकर हिने मिळविला. तसेच फॅशन डिझायनिंगमध्ये रश्मिता आजगावकर हिने प्रथम क्रमांक, सरप्राईज इव्हेंट या स्पर्धेत दीया भाला व मदन गुरव यांना द्वितीय क्रमांक मिळाला. सामूहिक गायन स्पर्धेत अनघा कुलकर्णी, क्रांती विचारे, प्रगती शिंदोळकर, सृष्टी कुंदगोळकर, तन्वी इनामदार, श्रावणी गुरव, सृष्टी बिर्जे, सर्वेश देसाई यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
फिल्म मेकिंग स्पर्धेत सम्यक लंगडे, आरुष कलघटगी, सिद्धार्थ आचमनी यांनी तृतीय क्रमांक मिळविला. याचबरोबर विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळविले. सर्व विद्यार्थ्यांना शिक्षिका रिबेका सेराफिम यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे प्रशासक डॉ. गोविंद वेलींग व प्राचार्या मंजिरी रानडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.









