ऑनलाईन टीम/तरुण भारत
रशिया-युक्रेनमध्ये गेल्या दहा दिवसांपासून युद्ध सुरूच आहे. रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. अनेकांनी रशियाच्या या हल्ल्याला विरोध केला असून युद्ध थांबवावे असा सल्लाही अनेक देशांनी दिला आहे. अमेरिकेसह युरोपियन देशांनी राशीवर निर्बंध लादले आहेत. तरीही रशिया युद्ध थांबवायचं नाव घेत नाही. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील अनेक महत्वाची शहरे उध्वस्त झाली आहे. तर यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे. अनेक युक्रेन नागरिकांनी देश सोडून शेजारील देशांमध्ये आश्रय घेतला आहे. तसेच युक्रेनमध्ये अनेक भारतीय अडकून पडले आहेत. त्यांना भारतात आणण्यात येत असून त्यासाठी ऑपरेशन गंगा सुरु आहे. या ऑपरेशन अंतर्गत आता पर्यंत ११ हजार भारतीयांना भारतात आणल्याचे म्हंटले जात आहे.
दरम्यान, रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्यापासून केंद्र सरकारने युक्रेनमधील भारतीयांना आपल्या देशात आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ सुरु केलं आहे. या अंतर्गत आतापर्यंत 11,000 भारतीयांना सुरक्षित परत आणले आहे. एअर एशियाच्या विमानाने दिल्लीला पोहोचलेल्या 170 नागरिकांचे स्वागत करण्यासाठी आलेले परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ही माहिती दिली. मुरलीधरनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत एक ट्विट करण्यात आले आहे. तर परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरन यांच्या व्यतिरिक्त भारतीय वायुसेनेने आज ट्विट केले की ‘ऑपरेशन गंगा’चा एक भाग म्हणून गेल्या 24 तासांत पोलंड, रोमानिया आणि स्लोव्हाकियाच्या एअरफील्डमधून 629 भारतीय नागरिकांसह तीन IAF C-17 विमाने हिंडन एअरबेसवर परतली. तसेच या विमानांनी 16.5 टन मदत सामग्री बाधित देशांत पोहोचवली आहे.