नवी दिल्ली / वृत्तसंस्था
युपेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी चार केंद्रीय मंत्री युपेनच्या शेजारी देशांमध्ये जाऊन मदत व सुटकेच्या ‘मिशन गंगा’मध्ये प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी मोदी सरकारने सोमवारी हा मोठा निर्णय घेतला. विदेशी जाणाऱया मंत्रिमहोदयांमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया, हरदीपसिंग पुरी, किरण रिजिजू आणि जनरल व्ही. के. सिंग या मंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान, सोमवारीपर्यंत सहा विमानांमधून 1 हजार 396 भारतीयांची युपेनमधून घरवापसी झाली आहे. सोमवारी दुपारी हंगेरीतील बुडापेस्ट येथून 240 जणांना घेऊन भारताकडे रवाना झालेले विमान रात्री मायदेशी दाखल झाले.
युपेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या घरवापसीबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत चार मंत्र्यांना युपेनच्या शेजारी देशात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, हरदीप सिंग पुरी यांच्याकडे हंगेरी, किरेन रिजिजू यांच्याकडे स्लोव्हाकिया, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे रोमानिया आणि मोल्दोव्हा, जनरल व्ही. के, सिंग यांच्याकडे पोलंडची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे मंत्री नागरिक आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी समन्वय ठेवतील अशी माहिती मिळाली आहे.
‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत युपेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या पाच दिवसांपासून रशिया आणि युपेनमध्ये युद्ध सुरू झाल्यामुळे युपेनमधील भारतीय नागरिकांची सुरक्षाही धोक्मयात आली आहे. रशियाकडून सतत होणाऱया हल्ल्यामुळे युपेनमधील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून अनेक विद्यार्थी बंकरमध्ये राहत आहेत. काही ठिकाणी आता अन्न-पाण्याविनाही लोकांचे हाल होत आहेत. तसेच एकमेकांवर हल्ले सुरू असल्यामुळेही तेथील परिस्थिती कठीण बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एअर इंडियाच्या विमानाने विद्यार्थी भारतात येत आहेत. युपेनमधील गंभीर परिस्थिती पाहता विविध देश एकमेकांना मदत करत आहेत.
युक्रेनबाहेर पडण्यासाठी रेल्वेमार्गाचाही आधार
अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने पर्यायी रेल्वे मार्ग शोधला आहे. हा रेल्वेमार्ग पश्चिम युपेनमधील उझोरोड ते हंगेरीची राजधानी बुडापेस्टपर्यंत जाणार आहे. आतापर्यंत बऱयाच भारतीयांना रस्तेमार्गाने विविध वाहनांमधून अन्य देशांमध्ये नेण्यात येत होते. पण, हल्ल्यांची परिस्थिती चिघळत असल्यामुळे आता पर्यायी मार्गांची चाचपणी केली जात आहे.
कोरोना नियमात शिथिलता
युपेनमधून बाहेर काढल्या जाणाऱया विद्यार्थ्यांसाठी सरकारने कोविड नियम शिथिल केले आहेत. याअंतर्गत फ्लाईटमध्ये चढण्यापूर्वी आरटी-पीसीआर निगेटिव्ह असण्याची अट काढून टाकण्यात आली आहे. तसेच कोरोना लसीकरण प्रमाणपत्राची सक्तीही रद्द केली आहे. याशिवाय हवाई सुविधा पोर्टलवरही कागदपत्रे अपलोड करावी लागणार नाहीत. मात्र, कोविड प्रोटोकॉलचे पालन करू न शकणाऱया विद्यार्थ्यांना 14 दिवस सेल्फ क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे.









