बेंगळूर/प्रतिनिधी
खासगी शाळा व्यवस्थापनाने पालकांना विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन वर्गाची फी भरण्याची मुभा देण्यासाठी कालावधी वाढवत १५ डिसेंबरपर्यंत फी भरण्याची मुदत दिली आहे.
पूर्वी शाळांनी शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १ डिसेंबरपासून ऑनलाईन वर्ग बंद करणार असल्याचे सांगितले होते.
शुक्रवारी बेंगळूर येथील सार्वजनिक सूचना आयुक्त यांच्यासमवेत खासगी शाळांच्या व्यवस्थापन संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत फी भरण्याची मुदत वाढविण्याचा निर्णय झाला. दरम्यान फी भरण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर असणार आहे.









