कुस्ती मल्लविद्या महासंघाचे आयोजन : विना प्रेक्षक होणार कुस्ती मैदान : भारतातील पहिला प्रयोग
वार्ताहर / खानापूर
भारतातील पहिल्या विना प्रेक्षक ऑनलाईन कुस्ती दंगलीचे आयोजन कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे करण्यात आले असून अनेक लहान मोठ्या कुस्त्या या मैदानात लावण्यात येणार आहेत. सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतात कुस्ती मैदान भरवण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. मात्र लाखो रुपये खर्च करून पैलवानांनी तब्येत राखली आहे. कुस्ती मैदान बंद असल्याने खुराखचा खर्च वाया जात आहे. या पार्श्वभूमीवर कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या मैदानास महत्त्व प्राप्त झाले असून रविवारी दुपारी तीन वाजल्यापासून या मैदानाचा ऑनलाईन लाभ घ्यावा असे आवाहन सांगली जिल्हा प्रमुख पै. प्रवीण शिंदे व कार्याध्यक्ष सिद्धेश्वर गायकवाड यांनी केले आहे.
कुस्ती म्हणलं की बलदंड पैलवान, त्यांच्या शड्डूचा आवाज आणि प्रेक्षकांच्या कल्लोळ असे काहीसे समीकरण आजपर्यंत पाहायला मिळाले आहे. कोरोना विषाणूच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंगचे कारण देत कुस्ती मैदाने बंद करण्यात आली. त्यामुळे पैलवानांच्या शड्डू आवाजच बंद झाला होता. आता हा शड्डू कुस्ती मैदानात पाहायला कधी मिळेल सांगता येणार नाही. म्हणूनच कुस्ती मल्लविद्या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश मानुगडे यांच्या संकल्पनेतून कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले असून या मैदानातील सर्व कुस्त्या सोशल मीडियावर ऑनलाईन पाहायला मिळणार आहेत. हा आपल्या देशात प्रायोगिक तत्वावर पहिलाच प्रयोग केला जात आहे. अशी अनेक मैदाने दर महिन्याला भरवली जाणार आहेत.
या कुस्ती मैदानात आयोजित प्रेक्षणीय लढती पुढील प्रमाणे
पै संतोष दोरवड (उप महाराष्ट्र केसरी) विरुद्ध पै विष्णुपंत खोसे (युवा महाराष्ट्र केसरी, भारतीय सेनादल), पै विक्रम वडतीले (महाराष्ट्र पोलीस दल) विरुद्ध पै रवींद्र शेडगे (महाराष्ट्र चॅम्पियन), पै आशिष वावरे (राष्ट्रीय विद्यापीठ विजेता) विरुद्ध पै शशिकांत बोंगार्डे (राष्ट्रीय विजेता), पै अनिकेत गावडे विरुद्ध पै ओंकार जाधव तसेच लहान वजन गटात तीन लढती होणार आहेत. या कुस्त्या खालील लिंकद्वारे सुद्धा पहायला मिळणार असून याचा लाभ कुस्ती शौकिनांनी घ्यावा असे आवाहन मैदानाचे प्रायोजक व जिल्हा कार्याध्यक्ष सिद्धेश्वर गायकवाड यांनी केले आहे.
https://youtu.be/AGGHdsxEc2I
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








