सावंतवातील मायबा प्रोड्युसर कंपनीचे आयोजन
ओटवणे / प्रतिनिधी:
जागतिक जैव इंधन दिनानिमित्त सावंतवाडी येथील मायबा प्रोड्युसर कंपनीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत लहान गटात कु. आर्यन रवि गावडे याने तर मोठ्या गटात कु ऋतुजा सुनिल परब हिने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत एकूण ६८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा इयत्ता १ ली ते ४ थी आणि इयत्ता ५ वी ते ७ वी अशा दोन गटात आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्पर्धा प्रमुख म्हणून आंबेगाव शाळेचे शिक्षक नितीन नामदेव सावंत यांनी काम पाहिले. तर स्पर्धेचे परीक्षण अस्मिता अरविंद मुननकर, स्नेहा जगदीश धोंड, स्नेहल बापूराव जगदाळे यांनी केले. ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे लहान गट प्रथम क्रमांक – कु. आर्यन रवि गावडे, द्वितीय क्रमांक – कु तनिश तेजस गावडे, तृतीय क्रमांक – कु समित न्हानू कुंभार, मोठा गट – प्रथम क्रमांक – कु ऋतुजा सुनिल परब, द्वितीय क्रमांक – प्रिती नितीन भालेकर, तृतीय क्रमांक -अनुष्का अमित सावंत स्पर्धेचे पारितोषिक वितरण मायबा प्रोड्युसर कंपनीच्या सावंतवाडीतील प्रकल्प कार्यालयात करण्यात आले. यावेळी मायबा प्रोड्युसर कंपनीचे संचालक सुरजी राऊळ, बन्सीधर सांगेलकर, अनंत सावंत, मनोहर मयेकर आदी उपस्थित होते. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी पर्यावरण जनजागृती विषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन प्रियांका गावडे तर आभार स्वप्नील तेजम यांनी मानले.









