देशात ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, ग्रोफर्स, स्विगी आणि बिग बास्केटसोबत राहणार टक्कर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
मुकेश अंबानी यांनी ई कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करत प्रतिस्पर्ध्यांना टक्कर दिली असल्याचे पहावयास मिळत आहे. रिलायन्स कंपनीच्या जिओ मार्ट ऑनलाईन ग्रॉसरीने रिटेल बाजारात तेजी पकडलेली आहे. ग्रॉसरी बाजारात प्रामुख्याने जिओ मार्ट ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, ग्रोफर्स, स्विगी आणि बिग बास्केट यासारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना जोराची टक्कर देत आहे.
बिग बास्केटसोबत टाटा समूहाची 50 टक्के हिस्सेदारी घेण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. जागतिक ब्रोकर हाऊस गोल्डमॅन सॅक्सच्या अहवालानुसार ऑनलाइन ग्रॉसरी विभागामध्ये रिलायन्स जिओ येत्या काळात अव्वल ठरण्याचे संकेत आहेत.
आर्थिक वर्ष 2025 पर्यंत जिओ मार्टचा मार्केट समभाग जवळपास 50 टक्क्मयांवर पोहोचला असून यांचे सर्वात मोठे कारण हे जिओचा वेगवेगळय़ा क्षेत्रात वाढणारा सहभाग आहे. रिलायन्स रिटेलमध्ये सातवी कंपनी पीआयएफ 9,555 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे म्हटले आहे. सध्या जिओ मार्ट ऍप सादर करण्यात आल्यानंतर जवळपास 10 लाख वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. सदरचे ऍप गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल स्टोअरमध्ये डिझाइन करण्यात आले आहे.









