हळदी/ प्रतिनिधी
वाशी ता. करवीर येथील एश्वर्या बाबासाहेब पाटील ( वय वर्षे 20 ) या महाविद्यालयीन युवतीने गुरुवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
एश्वर्या पाटील बी.फार्मचे शिक्षण घेत होती. कोरोनामुळे बरीच दिवस ऑनलाईन शिक्षण चालू आहे. पण ऑनलाईन शिक्षण समजत नसल्याने ती गेली पाच, सहा दिवस अस्वस्थ होती. याच नैराश्यातून तिने घरी पंख्याला साडीने गळफस लावून घेतला व आत्महत्या केली. ही दुदैर्वी घटना घडल्याने वाशी परिसरात हळ हळ व्यक्त होत आहे.








