नवी दिल्ली
ऑडी इंडियाने आपल्या नव्या आरएस 7 स्पोर्टस्बॅक या मोटरगाडीचे आगाऊ बुकिंग सुरु केले आहे. यामुळे इच्छुक ग्राहकांना ही कार खरेदीसाठी बुक करता येणार आहे. सदर गाडीची प्रत्यक्षात विक्री मात्र ऑगस्ट 2020 मध्ये केली जाणार आहे. 5 सिटर गाडीची किंमत 10 लाख रुपये असणार असून मंगळवारी सदर गाडीच्या बुकिंगचा शुभारंभ पार पडला.









