प्रतिनिधी / बेळगाव :
ऑटोरिक्षा 15 ते 20 वर्षे झाल्यानंतर स्क्रॅपमध्ये घालण्याचा जो आदेश काढण्यात आला आहे तो आदेश अन्यायकारक आहे. कारण बऱयाचवेळा रिक्षा सुस्थितीत असतात. मात्र त्या रिक्षा स्कपमध्ये काढताना मोठा वेदना होतात. याचबरोबर रिक्षा चालक वयोवृध्द झाल्यानंतर ती रिक्षा देताना दुःख वाटते. तेंव्हा हा आदेश मागे घेवून किमान 25 ते 30 वर्षे रिक्षा चालविणे अशी मुभा द्यावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा ऑटोरिक्षा मालक, चालक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.
रिक्षा क्यवसाय करुन केवळ आपला उदरनिर्वाह करु शकतो. मात्र रिक्षा घेण्यासाठी जे कर्ज लागते ते कर्ज फेडण्यामध्येच आमचे आयुष्य जात आहे. यातच 15 ते 20 वर्षांनंतर रिक्षा स्क्रॅप केल्यानंतर पुन्हा रिक्षा घेण्यासाठी कर्ज घ्यावे लागत आहे. त्यामुळे आमचे आयुष्य रिक्षाचे कर्ज भरण्यातच जात आहे. तेंव्हा आम्हाला रिक्षा चालविण्यास अधिक मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
शिरस्तेदान एम. एम. नदाफ यांना निवेदन देण्यात आले. इलीयाज मुल्ला, मलिक तोडेवाले, श्रीकांत शहापूरकर, किरण पवार, विठ्ठल कालकुंद्रीकर, हैदरअली हजरत भाई, संजय सुळगेकर, फैयाज बागेवाडी, महेश कावडे, मेहबुब पटवेगार, शरीफ नदाफ, बसीरअहमद रमजान यांच्यासह रिक्षा चालक उपस्थित होते.









