बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने काही जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन राज्यभरातील मोठ्या सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात सणासुदीचा हंगाम ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान सुरू होतो. या महिन्यांत वरमहलक्ष्मी वर्षा, मोहरम, कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी आणि दुर्गापूजा यासह सण साजरे केले जातात. या सणासुदीच्या दिवसांमध्ये स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्याचे निर्देश राज्य सरकारने जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहेत.
राज्य सरकारने गुरुवारी जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे की, सणासुदीच्या काळात सार्वजनिक उत्सवांचे किंवा सामूहिक मेळाव्यांना परवानगी दिली जाणार नाही.